आपल्या अर्जाची स्थिती
 
     
 
 
 
 


इंटरनेटद्वारे अर्ज करण्या बाबत

इंटरनेटद्वारे अर्ज भरण्या साठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा:

१. ज्येष्ठ नागरिक दाखला अर्ज
२. नॉन - क्रिमी लेअर दाखला अर्ज
३. जातीच्या दाखलयाचा अर्ज
४. उत्पन्नाच्या दाखया चा अर्ज
५. डोमिसाईल च्या दाखल्या चा अर्ज

६. अनुसूचित जमातीच्या दाखल्याचा अर्ज

 

 • मुंबईतील सेतु केंद्रात इंटरनेटद्वारे अर्ज करण्याची सुविधा http://mumbaicitysetu.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
 • सदर संकेतस्थळावरुन अर्ज करण्यापूर्वी आपल्या संगणकावर खाली नमुद केलेल्या तांत्रिक बाबी असल्याची खात्री करुन घ्यावी.
 • Internet Explorer 7 किंवा Internet Explorer 8 किंवा Mozila Firefox याचा वापर करावा.
 • Internet Explorer मधील View --> Encoding --> Unicode (UTF-8) हा पर्याय निवडावा.
 • Internet Explorer मधील Tools --> Compatibility View हा पर्याय निवडावा. या पर्यायावर बरोबरचे चिन्ह असल्याची खातरजमा करावी. या पर्यायाद्वारे मराठी जोडाक्षरे व्यवस्थित दिसू शकतील.
 • संगणकावर Acrobat Reader स्थापित (Install )  करणे अत्यावश्यक आहे.
 • संकेतस्थळाद्वारे खाली नमूद केलेल्या 5 प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिक अर्ज करु शकतात.
  • ज्येष्ठ नागरिक दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • नॉन - क्रिमी लेअर दाखला
  • जातीचा दाखला
  • वास्तव्य दाखला
 • आपणास हव्या असलेल्या दाखल्याच्या नावावर क्लिक करावे.
 • दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी संगणकावर दिसेल.
 • पुढील स्क्रीनवर दाखल्यासाठी असणारी माहिती नागरीकांच्या दाखल्याच्या आवश्यकतेनुसार इंग्रजी भाषेत टाईप करावी.
 • सादर/Submit यावर क्लिक केल्यावर आपल्याला आपला मागणी अर्ज क्रमांक येईल व आपला अर्ज कोणत्या सेतु केंद्रात अग्रेषित केला आहे याची माहिती देण्यात येईल.
 • अर्जाच्या विहित नमुन्याची छापील प्रत काढावी. सदर अर्जात आवश्यकतेनुसार तलाठी अहवाल व प्रतिज्ञापत्राचे विहित नमुने उपलब्ध आहेत. सदर अर्जातील संपूर्ण माहिती भरुन अर्जदाराने स्वाक्षरी केलेला अर्ज संबंधित सेतु केंद्रात सादर करावा.
 • अर्जाच्या पावतीमध्ये नमूद केलेल्या सर्व सूचनांचे नागरीकांनी काटेकोर पालन करावे.
 • विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रे , अर्जाची पावती, विहित मुदतीत संबंधित सेतु केंद्रात जमा केल्यास आवश्यक असलेला दाखला त्वरित देणे शक्य होईल.
 • सेतु केंद्रातून घेण्यात आलेला अंतिम दाखला नागरीकाने तपासून पहावा व दुरूस्ती आवश्यक असल्यास सेतु केंद्रातील संगणक कर्मचा-याच्या निदर्शनास आणून दयावी.
 • वितरित केलेल्या अंतिम दाखल्यातील चूक त्याचवेळी दुरूस्त करून न घेतल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदारावर राहील.
 • ऑनलाईनद्वारे उपलब्ध होणा-या दाखल्यापैकी जातीचा दाखला उपजिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीने दिला जात असल्याने हा दाखला अर्जदाराने सेतु केंद्रामध्ये प्रत्यक्ष अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर १५ दिवसांनी सेतु केंद्रातून दिला जाईल.

 
 
     
 
 
     
© 2011, Mumbai City Setu Office. All rights reserved.