आपल्या अर्जाची स्थिती
 
     
 
 
 
 

शंका -  समाधान

प्र     सेतू कार्यालयाच्या वेळा काय आहेत ?
उ     अर्ज जमा करण्याची वेळ - सकाळी १०:३० ते दुपारी १:००
       दाखला मिळण्याची वेळ - दुपारी २:०० ते ४:००

प्र     जेष्ठ नागरिक दाखल्याचा उपयोग काय ?
उ     ६० वर्षावरील नागरिकांना शासनाने काही सुविधा दिल्या आहेत. जेष्ठ नागरिक दाखल्यान्व्ये  अनेक
फायदे उपलब्ध आहेत, जसे रेल्वे प्रवास, विमान प्रवास  सवलत, बँक व्याज दर इ.

प्र     वास्तव्य दाखल्याचा उपयोग काय ?
उ     वास्तव्य दाखला १५ वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना दिला जातो. हा दाखला नागरिकांना
कायम वास्तव्यचा पुरावा देतो, तसेच शाळा व कॉलेजच्या प्रवेशासाठी साठी त्याचा उपयोग होतो.

प्र     जातीय दाखल्याचा उपयोग काय ?
उ     जातीय दाखला हा मागास वर्गीयांसाठी (अ. ज. / अ. जा. / वि. ज. / भा. जा. / इ. मा. व. / वि. मा. प्र.)
उपलब्ध  करण्यात आला आहे. हा दाखला धारकांना सरकारमान्य विविध संधीचा लाभ घेण्यास मदत करतो
जसे नोकरीची संधी, शासकीय कार्यालायीन बढती इ.

प्र     नॉन - क्रिमी लेअर दाखल्याचा उपयोग काय ?
उ     हा दाखला मागासवर्गीय लोक, ज्यांचे उत्पन्न ४.५ लाखांपेक्षा कमी आहे अशांना दिला जातो. या अन्वये दाखला
धारकांना विविध शासकिय संधींचा लाभ घेता येतो.

प्र     जेष्ठ नागरिक दाखल्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उ     जेष्ठ नागरिक दाखल्याला लागणाऱ्या कागदपत्रांसाठी इथे “क्लीक” करा.

प्र     वास्तव्य दाखल्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उ     वास्तव्य दाखल्याला लागणाऱ्या कागदपत्रांसाठी इथे “क्लीक” करा.

प्र     जातीय दाखल्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उ     जातीय दाखल्याला लागणाऱ्या कागदपत्रांसाठी इथे “क्लीक” करा.

जेष्ठ नागरिक दाखल्या संबंधित प्रश्न.
प्र     माझ्याकडे वयाचा पुरावा नाही. मला जेष्ठ नागरिक दाखला कसा मिळू शकेल?
उ     कृपया तुमच्या विभागातील कोणत्याही शासकीय इस्पितळात भेट द्या. उ. सेंट जॉर्ज इस्पितळ, जे. जे. इस्पितळ,
नायर इस्पितळ, सायन इस्पितळ, ई. या इस्पितळाना तुम्हाला वयाचा दाखला देण्याचा अधिकार आहे.
तुमचे लहान आकाराचे फोटो (passport size) सोबत न्यावे.

उत्पन्न दाखल्या संबंधित प्रश्न.
प्र     मी एक साधा भाजी विक्रेता / गृहिणी / विधवा आहे. मला उत्पन्न दाखला मिळण्यासाठी कोणते पुरावे द्यावे
लागतील?
उ     तुम्ही तुमच्या स्थानिक अधिकारी किंवा आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक ई. कडे उत्पन्न दाखल्यासाठी
विनंती करू शकता.

उत्पन्न वास्तव्य दाखल्या संबंधित प्रश्न.
प्र     वास्तव्य दाखल्यासाठी मला नागरिकत्व प्रमाणपत्रकाची आवश्यकता आहे काय?
उ     वास्तव्य दाखला १५ वर्षासाठी मिळतो. नागरिकत्वाचे प्रमाणपत्रक आवश्यक आहे. योग्य तो नागरिकत्व
दाखला सदर केल्यावरच वास्तव्य दाखला दिला जाईल.

जातीविषय (मागासवर्गीय) दाखल्या संबंधित प्रश्न.
अनुसुचित् जाती-जमाती साठी प्रमाणपत्रक – नागरिकाचे वास्तव्य १०-०८-१९५० पूर्वी किंवा पासून असल्याचा
पुरावा दाखविल्यावर मिळू शकते.
विमुक्त / भटक्या जमातीसाठी प्रमाणपत्रक – नागरिकाने त्याचे जातीविषयक तसेच त्याचे वास्तव्य २१-११-१९६४
पूर्वी किंवा पासून असल्याचा पुरावा दाखविल्यावर मिळू शकते.
इतर मागासवर्गीय जमातीसाठी प्रमाणपत्रक – नागरिकाने त्याचे वास्तव्य १३-१०-१९६७ पूर्वी किंवा पासून
असल्याचा पुरावा दाखविल्यावर मिळू शकते.
NCL – मागील ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला दाखवणे आवश्यक आहे. बेकार असल्यास स्थानिक अधिकाऱ्याकडून
पत्रक सदर करावे.

 
     
 
 
     
© २०११, जिल्हाधिकारी कार्यालय.